For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना महिला सेना तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण

शिवसेना महिला सेना तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण
Advertisement

मालवण / प्रतिनिधी

Advertisement

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महिला संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सौ. पूनम नागेश चव्हाण (रा. मालवण) यांची शिवसेना पक्षाच्या "महिलासेना तालुका प्रभारी (कुडाळ, मालवण)" पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी सुशांत पडते यांनी त्यांना या नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले आहे. सौ. चव्हाण या मालवण नगर पालिकेमध्ये आरोग्य सभापती म्हणून कार्यरत आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.