महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ठकसेन पूजाला मीच अटक करुन दिले होते’

12:45 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री सावंत यांची प्रतिक्रिया : यापूर्वी चारवेळा केली होती अटक,ती सरकारी कर्मचारी वगैरे काही नाही

Advertisement

डिचोली : सरकारी नोकऱ्या पैसे देऊन मिळत नाहीत. नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक आहे. पैसे घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यासाठी अनेक लोक सरसावले आहेत. त्यातीलच एक पूजा पुरुषोत्तम नाईक आहे. आपणच सर्वप्रथम अटक करून दिले होते. लोक तरीही तिच्यावर कोणत्या आधारावर विश्वास ठेऊन सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देतात, तेच आपणास समजत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. लोकांनी अशा फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध व सतर्क रहावे. अशा प्रकारांचा संशय आल्यास थेट सरकारदरबारी किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. अशी फसवणूक करणारे व त्यांना अशा प्रकरणात सहकार्य करणारेही सुटणार नाहीत. त्यांनाही ताब्यात घेऊन गजाआड करण्याचे आदेश आपण दिले आहेत. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले.

Advertisement

पूजा नाईक ही एकदा आपल्या घरी एका व्यक्तीला घेऊन आली होती, सदर व्यक्तीला नोकरी द्या म्हणून सांगायला. त्यावेळी मी तिला विचारले होते, की तू सदर व्यक्तीबरोबर का आली आहे ? त्याच्याकडून पैसे घेतले आहे का ? तिची कसून चौकशी केल्यावर सारा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिला अटकही झाली होती. तिला त्यानंतर चारवेळा अटक झाली. तरीही लोक तिला बळी पडतात आणि पैसे का म्हणून देतात? गोव्यात सध्या अशी प्रकरणे वाढतच चालली असून सरकारसाठी ती डोकेदुखी ठरत आहेत. अशा प्रकरणांमुळे सरकारचीही बदनामी होत आहे. त्यामुळेच आपण अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘नो मॅन्स लँड’ ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु

गोव्यात जमिनींचे गैरव्यवहार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत झालेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात ‘नो मॅन लँड’ जमिनी आढळून आलेल्या असून त्या सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे,  त्यासाठी आवश्यक योग्य तो कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकार या सर्व जमिनी आपल्या ताब्यात घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी सांखळी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. गोव्यात बेकायदेशीर व अवैधरित्या जमिनींचे होणारे गैरव्यवहार नियंत्रणात आणण्यासाठी एसआयटी आपल्याच सरकारने आणली. या चौकशी दरम्यान सरकारला ‘नो मेन लँड’ अशा जमिनी आढळून आलेल्या आहेत. अशा जमिनी कोणत्याही प्रकारची बनावट कागदपत्रे बनवून परस्पर विक्री होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात जमीन गैरव्यवहार तसेच फसवणूक, बनावट कागदपत्रे करून लोकांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रकारांमध्ये बरीच वाढ झाली होती. या गैरव्यवहारांमध्ये लँड माफियांसह सरकारी अधिकारी, कर्मचारीही गुंतले होते. या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2022 साली सरकार स्थापन झाल्यानंतर एसआयटी स्थापन केली होती. या एसआयटीमार्फत गोव्यातील अनेक जमीन गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यात काही सरकारी अधिकारी व जमीन दलालांना अटकही झाली होती. आता अशा प्रकारांवर एसआयटीमुळे आळा बसला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article