कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूजा तोमर यूएफसी स्पर्धेत विजेती

06:09 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ केंचुकी

Advertisement

येथे झालेल्या अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी) स्पर्धेत भारताच्या पूजा तोमरने विजेतेपद पटकावित नवा इतिहास घडविला. पूजा तोमर ही मिश्र मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय महिला स्पर्धक आहे.

Advertisement

महिलांच्या 52 किलो वजन गटातील अंतिम लढतीत पूजा तोमरने ब्राझीलच्या रायेनी डोस सँटोसचा 30-27, 27-30, 29-28 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. हा विजय केवळ माझा एकटीचाच नसून तो सर्व भारतीय शौकिनांचा आणि फायटर्स यांचा असल्याचे पूजा तोमरने पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 30 वर्षीय पूजा तोमरबरोबर यूएफसीसाठी करार करण्यात आला होता.

 

 

Advertisement
Next Article