दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत दिसणार पूजा
अभिनेत्री पूजा हेगडे ही पुढील वर्षी अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. पूजा आता एका तेलगू रोमँटिक चित्रपटात दिसून येणार आहे. दाक्षिणात्य स्टार दुलकर सलमान आणि पूजा हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण नववर्षात सुरू होणार आहे.‘लकी भास्कर’ या सारख्या गाजलेल्या चित्रपटानंतर दुलकर सलमान पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपटांच्या दिशेने वळला आहे. दुलकर सलमानला स्वत:च्या चित्रपटांद्वारे प्रेमाच्या वेगवेगळ्या पैलूंना सादर करणे पसंत असल्याचे मानले जाते.
पूजा हेगडे पुढील वर्षीच्या प्रारंभी शाहिद कपूरसाब्sात अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘देवा’मध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर तिच्याकडे विजयसोबत ‘थलपति 69’ आणि सूर्यासोबत ‘सूर्या 44’ असे चित्रपट देखील आहेत. तसेच ‘जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात ती नायिकेच्या भूमिकेत असून यात वरुण धवनसोबत तिची जोडी जमणार आहे.