For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूजा नाईकची होणार नार्को विश्लेषण चाचणी

12:14 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पूजा नाईकची होणार नार्को विश्लेषण चाचणी
Advertisement

पणजी : गेल्या दीड वर्षभरापासून गाजत असलेल्या ‘नोकरीसाठी लाच’ प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने तिच्यावर नार्को-विश्लेषण चाचणी करण्यास संमती दिली आहे. गुन्हे शाखेने तिला गुजरातमधील फॉरेन्सिक विज्ञान संचालनालय येथे नेऊन तिची नार्को-विश्लेषण चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली आहे, अशी माहिती गुन्हा शाखेचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली. पूजा नाईक हिने मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि एका आयएएस अधिकाऱ्यांना आपण 17.6 कोटी ऊपये दिल्याचा आरोप जाहीररित्या केला होता. मात्र तिने जबानीत दिलेली माहिती आणि पोलिसांनी केलेल्या तपासकामात कोणतीच जुळवाजुळव होत नसल्याने तिची नार्को-विश्लेषण चाचणी करणे आवश्यक आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांना दिले 17.6 कोटी

सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी आपण नोकरीसाठी इच्छूक असलेल्यांकडून गोळा केलेले 17.6 कोटी ऊपये वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडे दिले होते, असा आरोप पूजा हिने अधिकाऱ्यांची नावे घेत जाहीररित्या केला होता. पूजा 2012 मध्ये सांत इनेज येथील मगो पक्षाच्या कार्यालयात काम करत होती, जिथे तिची ओळख मंत्री रामकृष्ण ‘सुदिन’ ढवळीकर यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी करून दिली होती, अशी माहिती तिनेच जाहीररित्या दिली होती. त्यानंतर चौकशीतून उघड झाले की ती कधीही मगो पक्षाच्या कार्यालयात काम करत नव्हती.

Advertisement

डायरीही नाही, मैत्रिणही नाही!

पूजा नाईकने 613 नोकरीच्या इच्छुकांची नावे आणि त्यांच्याकडून गोळा केलेली रक्कम नोंद असलेली डायरी आपण ठेवली होती. नंतर ती डायरी मैत्रिणीला देण्यात आली, असा दावा तिने केला होता. मात्र तिने  उल्लेख केलेल्या मैत्रिणीच्या पत्त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करताना पूजाला त्या मैत्रिणीसारखी कोणतीही व्यक्ती किंवा घर ओळखता आले नाही. एकंदरीत चौकशीत कोणतीही डायरी अस्तित्वात नव्हती आणि तिच्याशी संबंधित कोणतीही मैत्रिण नव्हती, असे उघड झाले, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.