For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सनकी’ चित्रपटात पूजा हेगडे

06:46 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सनकी’ चित्रपटात पूजा हेगडे
Advertisement

अहान शेट्टी असणार मुख्य भूमिकेत

Advertisement

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा पुत्र अहानने मिलन लुथरिया यांच्या ‘तडफ’ चित्रपटातून 2021 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अहान आता आणखी एका चित्रपटात दिसून येणार आहे. अहानने ‘सनकी’ या चित्रपटासाठी साजिद नाडियाडवालासोबत हातमिळवणी केली आहे.  अहान या रोमँटिक ड्रामा चित्रपटात पूजा हेगडेसोबत दिसून येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.

निर्माता साजिद नाडियाडवालाचा चित्रपट ‘सनकी’मध्ये पूजा हेगडे पहिल्यांदाच अहानसोबत काम करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. अहान स्वत:च्या आगामी चित्रपटावरून अत्यंत उत्सुक आहे. तो या चित्रपटात एक अनोखी आणि विचित्र व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे समजते. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना एक नवी जोडी पहायला मिळणार आहे. रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. तर अदनान ए. शेख आणि यासिर जाह यांच्याकडून याचे दिग्दर्शन केले जाणार आहे.

Advertisement

अहानने तडप या चित्रपटात तारा सुतारियासोबत काम केले होते. तडप हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. यामुळे अहानला आता नव्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर पूजा हेगडे ही बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रस्थापित अभिनेत्री आहे. पूजा हेगडेसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने अहान देखील उत्सुक आहे.

Advertisement
Tags :

.