‘रेट्रो’मध्ये पूजा हेगडे
सूर्यासोबत मुख्य भूमिकेत
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या आणि अभिनेत्री पूजा हेगडेचा आगामी चित्रपट ‘सूर्या 44’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखेशी माझे मन जोडले गेले आहे. रेट्रो भावनांच्या उतारचढावांनी युक्त एक प्रेमकहाणी असल्याचे पूजाने नमूद केले आहे. चित्रपटात पूजा ही एका गावातील युवतीची भूमिका साकारत आहे. तर सूर्याने यात तिच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. पूजा हेगडेकडे सध्या अनेक चित्रपट असून यात थलपति विजयसोबतचा ‘थलपति 69’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ समवेत अनेक रोमांचक प्रोजेक्ट आहेत. अभिनेत्रीने अलिकडेच चेन्नईत ‘थलपति 69’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. ‘थलपति 69’ चित्रपटात पूजा हे विजयसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. एच. विनोथ याचे दिग्दर्शक असून निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. तर सूर्या हा यापूर्वी ‘कंगुवा’ चित्रपटात दिसून आला होता. यात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली होती.