महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूजा गौरला मिळाली नवी वेबसीरिज

06:15 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजय वर्मा देखील असणार महत्त्वाच्या भूमिकेत

Advertisement

मन की आवाज प्रतिज्ञा आणि प्यार तूने क्या किया या मालिकांमधील अभिनेत्री पूजा गौरने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रीत केले आहे. पूजा अलिकडेच गन्स अँड गुलाब्स या सीरिजमध्ये दिसून आली होती. पूजा आता अनुभव सिन्हा यांच्या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

Advertisement

 

नवी वेबसीरिज 1999 च्या कंधार अपहरणावर आधारित असणार आहे. या सीरिजविषयी मी फार काही बोलू शकणार नाही, परंतु याचे नाव ‘फ्लाइट इन टू फियर’ असून यात विजय वर्मा माझ्यासोबत दिसून येणार आहे. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनात काम करण्याचा अनुभव अत्यंत नवा आणि अनोखा राहिला. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे पूजा गौरने म्हटले आहे.

एक कलाकार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्म मला अत्यंत पसंत पडत आहे. येथे सेन्सॉरशिप नसल्याने कहाण्यांसंबंधी स्वातंत्र्य आहे. येथे प्रायोगिक काम करण्याची संधी मिळत असून टीआरपीसाठीची पळापळ येथे नसल्याचे पूजाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article