For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनील शेट्टीसोबत झळकणार पूजा भट्ट

06:43 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुनील शेट्टीसोबत झळकणार पूजा भट्ट
Advertisement

लायन्सगेटच्या नव्या प्रोजेक्टसाठी आले एकत्र

Advertisement

अभिनेत्री पूजा भट्ट लवकरच लायन्सगेट इंडियाच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये पूजा भट्टसोबत सुनील शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी दोघेही ‘बॉर्डर’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. पूजा भट्टने स्वत:च्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे.

पूजाने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले आहे. सुनील शेट्टीसोबत पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे तिने म्हटले आहे. लायन्सगेटच्या या नव्या अॅक्शन थ्रिलरमध्ये पूजा भट्ट आयर्न लेडीच्या भूमिकेत दिसून येणार असल्याचे समजते. यात ती एका कणखर महिलेची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Advertisement

सशक्त महिलांना मोठ्या पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मला नेहमीच मिळाले आहे. याचमुळे या प्रोजेक्टची मी निवड केली आहे. संबंधित व्यक्तिरेखेची शक्ती, खोली आणि सहानुभूतीमुळे मी त्वरित त्याकडे आकर्षित झाले. ज्या गोष्टींवर ही व्यक्तिरेखा विश्वास ठेवते, त्याकरता भूमिका घेणे आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तिची क्षमता मला वैयक्तिक स्तरावर जोडून घेणारी असल्याचे पूजा भट्टने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.