रशियन चित्रपटात पूजा बत्रा
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा आता बॉलिवूड नव्हे तर रशियन चित्रपटातून कमबॅक करत आहे. पूजाने सोशल मीडिया हँडलवर रशियन चित्रपट ‘द मॅजिक लॅम्प’ची खास झलक शेअर केली आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. या चित्रपटाचा हिस्सा होता आल्याने आनंदी आहे. कला आणि चित्रपटांना कुठलीच सीमा नसते, असे तिने म्हटले आहे. याचबरोबर पूजाने चित्रपट निर्माता जो राजनसोबत मिळून इंग्रजी लघुपट ‘इकोज ऑफ अस’ निर्माण केला आहे. हा चित्रपट प्रेम, दु:ख आणि मानवीय नात्यांची कहाणी असून यात सलमान खानची प्रेयसी यूलिया वंतूर देखील दिसून येणार आहे. हा युलियाचा पहिला चित्रपट असून यात दीपक तिजोरी आणि स्पॅनिश अभिनेत्री एलेसेंड्रा व्हेलन मेरेडिज देखील मुख्य भूमिकेत आहे. याची कहाणी जो राजन यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे. पूजा बत्राने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. 1993 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल ठरल्यावर ती भारताची प्रसिद्ध मॉडेल ठरली होती. तिने 250 हून अधिक पॅशन शोमध्ये भाग घेतला होता. 1997 मध्ये तिचा पहिला चित्रपट ‘विरासत’ प्रदर्शित झाला, ज्यानंतर भाई, हसीना मान जाएगी यासारख्या 20 हून अधिक चित्रपटांमध्ये पूजा बत्रा हिने काम केले होते.