‘कंचना’च्या चौथ्या भागात पूजा अन् नोरा
कंचना फ्रेंचाइजी लवकरच चौथा चित्रपट आणणार आहे. कंचना 4 चित्रपटात यावेळी दाक्षिणात्य नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दिसून येणार आहेत. या फ्रेंचाइजीचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चाहते चौथ्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.
कंचना 4 चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असणार आहे. केवळ पूजाच नव्हे तर नोरा फतेही देखील या हॉरर कॉमेडी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स करणार आहे.
मनीष शाह हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. कंचना 4 हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होऊ शकतो. त्याच्या आठ आठवड्यांनी तो ओटीटीवर झळकणार आहे. कंचना ही फ्रेंचाइजी हिंदी प्रेक्षकांदरम्यान देखील अत्यंत लोकप्रिय आहे. यातील एका चित्रपटाचा हिंदी रिमेक झाला होता, ज्यात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती.
कंचना चित्रपट तमिळ भाषेत 2011 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर आणखी दोन चित्रपट सादर करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबत राघव लॉरेन्स हा यात अभिनय देखील करणार आहे.