पंटेमळ रोड-रेज प्रकरणी आमदारपुत्राची नरमाई; तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाकडे मागितली माफी
11:57 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कुडचडे : पंटेमळ येथील रोड-रेज प्रकरणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांनी आज कुडचडे पोलिस ठाण्यात हजर होत संबंधित ज्येष्ठ नागरिकाची माफी मागितली. या घटनेप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Advertisement
तक्रारीनंतर राहुल फळदेसाई पोलिस ठाण्यात उपस्थित झाले. यावेळी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकही पोलिस ठाण्यात उपस्थित होते. राहुल फळदेसाई यांनी त्यांच्याकडे माफी मागितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकानेही त्यांची माफी स्वीकारली.
माफी मागितल्यानंतर या प्रकरणात राहुल फळदेसाई यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Advertisement
Advertisement