महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानातील पंजाबमध्ये प्रदूषणाचे संकट

06:14 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवाज यांनी भारतावर फोडले खापर

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. विशेषकरून भारताला लागून असलेल्या लाहोर शहरात फैलावलेल्या धूरयुक्त धुक्यामुळे सर्वसामान्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. याचमुळे पंजाबमधील मरियम नवाज सरकारने पाकिस्तान सरकारला हा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे. भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे स्थिती बिघडल्याचा दावा मरियम नवाज सरकारने केला आहे. विषारी हवेमुळे लाहोरमधील शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. तसेच आणखी अनेक पावले उचलावी लागली आहेत.

भारताच्या दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे स्थिती बिघडली आहे. भारतातील अमृतसर आणि चंदीगड येथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे लाहोरमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 1,000 च्या वर पोहोचला आहे. पंजाबच्या प्रदूषणाचा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्यासाठी आम्ही पाकिस्तान सरकारच्या विदेश विभागाला पत्र लिहिणार आहोत अशी माहिती पाकिस्तान-पंजाब सरकारमधील पर्यावरण मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली आहे.

भारताचे सहकार्य आवश्यक

भारताच्या दिशेकडून लाहोरच्या दिशेने येणाऱ्या प्रदूषित वाऱ्यांमुळे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचत आहे. आणखी काही दिवस या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा नाही. अशा स्थितीत वृद्ध आणि मुलांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. आमचे सरकार स्मॉगवर नियंत्रण मिळविण्याच्या संयुक्त प्रयत्नांवर चर्चेसाठी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू इच्छित असल्याचे मरियम यांनी सांगितले आहे. 1 कोटी 40 लाख लोकसंख्या असणारे शहर लाहोर मागील अनेक दिवसांपासून स्मॉगने वेढलेले आहे. डिझेलचा धूर, काडीकचरा जाळल्याने निर्माण झालेला धूर आणि हिवाळ्यातील थंडीत पडणारे धुके अन् प्रदूषकांचे मिश्रण आहे.

Advertisement
Next Article