For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बागलकोट, दावणगेरे दक्षिणमध्ये आज मतदान

06:24 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
बागलकोट  दावणगेरे दक्षिणमध्ये आज मतदान
Advertisement

दोन मतदारसंघांत पेटनिवडणूक : मतदारांचा कौल  होणार मतदानयंत्रात बंद

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी गुरुवार 9 रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात खरी चुरस असून मतदारांचे कौल मतदानयंत्रात बंद होणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. याकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement

दावणगेरे दक्षिणमध्ये काँग्रेसचे समर्थ मल्लिकार्जुन आणि भाजपचे श्रीनिवासदास करियप्पा यांच्यात चुरशीची लढत आहे, तर बागलकोटमध्ये काँग्रेसचे उमेश मेटी आणि भाजपचे वीरण्णा चरंतीमठ यांच्यात अटीतटीची लढत आहे. या पोटनिवडणूक निकालाचा सत्ताधारी काँग्रेसवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसला तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांचा कल कुणाकडे आहे, हे समजू शकेल.

दावणगेरे दक्षिण मतदारसंघात 14 मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्याने काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण 25 जण पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे 284 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 234 तर उर्वरित 50 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. 76 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदार आणि 80 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी देण्यात आली आहे. सखी, दिव्यांग आणि युवा मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदानाचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बागलकोट विधानसभा मतदारसंघांत एकूण 2,59,797 मतदार असून त्यात 1,26,999 पुरुष, 1,32,775 महिला आणि 23 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघात 1,5,63 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 332 मतदारकेंद्रे उभारण्यात आली आहेत. येथील 9 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांच्या हाती असून 4 मे रोजी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.