For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Bacchu Kadu | फक्त मारायचे बाकी राहिले होते...!" संजय राऊतांवर उद्धव ठाकरे प्रचंड नाराज; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा

04:24 PM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
bacchu kadu   फक्त मारायचे बाकी राहिले होते      संजय राऊतांवर उद्धव ठाकरे प्रचंड नाराज  बच्चू कडूंचा  धक्कादायक दावा
Advertisement

मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या घडामोडीनंतर महायुतीतील नेत्यांकडून ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे. सचिन अहिर यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना त्यांनी, "आता सचिन आले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांची टीमही येईल. आम्ही त्यांचे मित्र म्हणून स्वागत करू," असे म्हटले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. "एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला बळकटी देण्याचे काम केले आहे," असे सांगत त्यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

Advertisement

मात्र, यानंतर बच्चू कडू यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. पक्षातील अनेक नेत्यांमध्ये राऊत यांच्या भूमिकेबाबत नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "फक्त मारायचे बाकी राहिले होते," असा धक्कादायक दावा बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि या आरोपांना कोणते उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.