शरद पवार जरांगेच्या आंदोलनाचे पहिले राजकीय बळी! अॅड. प्रकाश आंबेडकर
विधानसभेला कोणालाही पाठींबा नाही : ओबीसी, मुस्लिम, आदिवाशी संघटनांना सोबत घेणार
सांगली प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे ही मनोज जरांगे-पाटील यांची मागणी असंविधानिक आहे. या मागणीला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे ते केवळ मराठा समाजाचेच नेते असल्याचा संदेश ओबीसी समाजामध्ये गेला आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅङ प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केले. दरम्यान शरद पवार हे जरांगे यांच्या आंदोलनाचे पहिले राजकीय बळी ठरल्याचेही यावेळी अॅङ आंबेडकर यांनी सांगितले.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=W9hN1KZs4Rg[/embedyt]
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डावा होता. पण वंचित बहुजन आघाडीच्या रेट्यामुळे महायुतीचा डाव फसला. येत्या 8 ते 13 ऑक्टोंबर या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे असे सांगत आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांची मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मागणी मुळातच चुकीची आहे. याला पाठींबा देणे शरद पवार यांनी आतापर्यंत शिताफीने टाळले होते. पण आता त्यांनीही जरोंगे यांच्या मागणीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे केवळ मराठा समाजाचेच नेते आहेत, असा संदेश ओबीसी समाजामध्ये गेला आहे. सहाजिकच पवार हे जरांगे-पाटील यांच्या आरक्षण आंदोलनातील पहिले राजकीय बळी ठरले आहे.
मराठवाड्यामध्ये मराठा विऊध्द ओबीसी असा उघड लढा सुऊ आहे. तर अन्य जिल्ह्यामध्ये या लढ्याची तीव्रता मानसिक आहे. आपले आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे ओबीसी समाज महाविकास आघाडीला मतदार करेल असे वाटत नाही, असे सांगत आंबेडकर म्हणाले, गतवेळी मुस्लिम समाजानेही महाविकास आघाडीला मतदार केले. यावेळी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात उमेदवारी मिळावी, अशी मुस्लिम समाजाची इच्छा आहे. समाजातील संघटनांनी महाविकास आघाडीकडे 48 मतदार संघाची मागणी केली आहे. आघाडी ही मागणी पूर्ण करते का यावर मुस्लिम समाजाचे मतदान होईल.
राज्यात हिंदुत्ववादी संघटनांनी दंगली घडविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनाच दंगली नको आहेत, त्यामुळे त्यांचे डाव फसले असे सांगत अॅङ. आंबेडकर म्हणाले, धर्माच्या आधारावर राजकारणास पूर्ण विराम मिळाला आहे. बेरोजगारी, गावांचा विकास, हमीभाव याकडे जनतेचे लक्ष आहे. सत्ताधारी आमदारांना खिरापतीसारखा निधी वाटला जात आहे. मतदारसंघ विकत घ्या असे सांगितले जात आहे, त्यामुळे जनतेमध्ये चीड आहे. जनता निर्भय झाली आहे, हे चांगले उदाहरण आहे.
दरम्यान ओबीसी समाज, आदिवासी, मुस्लिम समाज संघटना, पक्षांशी चर्चा कऊन विधानसभेचे उमेदवार ठरविले जातील. 6 ऑक्टोंबर नंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल. यावेळी कोणालाही पाठींबा दिला जाणार नाही, असेही अॅङ आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
वसंतदादांच्या प्रेमामुळेच विशाल पाटलांना मदत
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमदेवार विशाल पाटील यांना वंचितने पाठींबा दिला होता. आता खासदार पाटील वंचितला पाठींबा देतील काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पाटील यांना पाठींबा देताना कोणतीही अट घातली नव्हती. माझ्या वडिलांचे 1977 मध्ये निधन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले वसंतदादा चारवेळा घरी आले होते. आमच्या कुटूंबाशी त्यांना जिव्हाळा होता. प्रेम होते. 1984 मध्ये त्यांनी मला कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते. पण मी ते नाकारले होते. दादांचे आमच्यावर असणारे प्रेम यामुळेच विशाल पाटील यांना मदत केली असे अॅङ आंबेडकर यांनी सांगितले.
तर जरांगेचे आंदोलन पवार पृरस्कृत
अॅङ आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला खासदार शरद पवार यांनी पाठींबा दिला आहे. जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी या भूमिकेवर ठाम राहेले पाहिजे. उमेदवार उभे करावेत. अन्यथा त्यांचे आंदोलन शरद पवार यांच्या पाठींब्यावरच सुऊ होते, हे स्पष्ट होईल. दरम्यान सद्य राजकीय स्थिती पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे वाटत नसल्याचेही अॅङ आंबेडकर यांनी सांगितले.