For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara political news | साताऱ्यात राजकीय खलबतं? मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजेंमध्ये अर्धा तास चर्चा

04:45 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
satara political news   साताऱ्यात राजकीय खलबतं  मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजेंमध्ये अर्धा तास चर्चा
Advertisement

                             गिरीश महाजन यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट

Advertisement

सातारा - राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन महाजन यांचे स्वागत केले.

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास दिलखुलास चर्चा व गप्पा रंगल्या. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे दोघांकडून स्पष्ट करण्यात आले. भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन हे सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी अधिकृतरित्या कोणतीही राजकीय भूमिका समोर आलेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.