विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी राजकीय राखीवता द्यावी : तानावडे
पणजी : गोवा राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी राजकीय राखीवतेची जोरदार मागणी राज्यसभा सदस्य खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शून्य प्रहराच्यावेळी केली. राज्यसभेचे अधिवेशन नवी दिल्लीत चालू आहे. गोव्यात आदिवासींना राखीवता देण्यात आलेली नाही. आवश्यक ते लोकसंख्याबळ गोव्यात असून त्यांना राखीवता मिळत नाही हा त्यांच्यावर अन्याय ठरतो. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित लोकप्रतिनिधी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करून आगामी निवडणुकीपूर्वी आदिवासींसाठी राखीवता बहाल करण्यात यावी, अशी तानावडे यांनी या अधिवेशनात मागणी केली.
खासदार तानावडेंचे आमदार गणेश गावकरांकडून अभिनंदन
राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी गोवा विधानसभेत एसटी म्हणजेच अनुसूचित जाती-जमातींना राजकीय आरक्षण देण्याच्या प्रस्ताव नुकताच राज्यसभेच्या अधिवेशनात मांडला. सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर यांनी त्यांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. राज्यसभेच्या सध्या सुऊ असलेल्या पावसाळी अधिवेशनात तानावडे यांनी ही मागणी केली आहे. एसटी समाज हा गोव्यातील एक महत्त्वाचा घटक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे राजकीय आरक्षण अनिवार्य आहे. आजवर हा समाज या हक्कापासून वंचित राहिल्याने त्यांचे सशक्तीकरण व विकास योग्यपद्धतीने होऊ शकलेला नाही. भारतीय राज्यघटनेने या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. त्याची गोवा राज्यात अंमलबजावणी कऊन या समाज घटकाला समान संधी व विकासाचा समान हक्क देण्याचा प्रस्ताव सदानंद तानावडे यांनी राज्यसभेत मांडला आहे. आमदार गणेश गावकर यांनी त्याबद्दल तानावडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.