महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एसटींना 2027 पर्यंत राजकीय आरक्षण

12:00 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोमुनिदादसंदर्भातील निर्णय योग्यच : विधानसभा हिवाळी अधिवेशन जानेवारीत,सभापती रमेश तवडकर यांची माहिती

Advertisement

पणजी : गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, याबाबतची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल मंगळवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तवडकर म्हणाले की, एसटी समाजाच्या आरक्षणासाठी काही लोकांकडून नुसता गोंधळ घालण्यात येत आहे. एसटी समाजाला 2027 पर्यंत राजकीय आरक्षण दिले जाणार असून, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर शिष्टमंडळ काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय दबावामुळे कुणीही नुसता गोंधळ घालू नये असेही त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement

कोमुनिदादचा सरकारी निर्णय योग्यच

कोमुनिदाद विषयावर बोलताना ते म्हणाले की, कोमुनिदादबद्दल सरकारने घेतलेला निर्णय उत्तम आहे. कोमुनिदाद जागेवरील घरात गोमंतकीय लोक गेली कित्येक वर्षे राहत आहेत. सरकारने ती घरे राहत असलेल्या लोकांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. इतकी वर्षे राहत असलेल्या लोकांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. कोणकोण मतदारसंघात फक्त आगोंदा भागातच सुमारे 60 टक्के घरे ही कोमुनिदाद जागेत असून, राहणारे सगळे स्थानिक लोक मूळचे गोमंतकीय आहेत. तसेच काणकोण मतदारसंघात कोमुनिदाद जागेवर असलेल्या सुमारे 70 घरांना मोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु त्यावर आम्ही स्थगिती आणल्याची माहिती देखील तवडकर यांनी दिली आहे.

आपण सभापतीपदात समाधानी

आज सभापती या पदावर काम करताना अनेक सामाजिक घटकांसाठी काम करण्याची संधी मिळत असून, काणकोण मतदारसंघातील विकासकामांना हातभार लावण्याची उत्तम संधी लाभत आहे. आपण या पदावर समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article