कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकीय पक्षांसमोर दुबार मतदारांचे संकट

06:47 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काढलेल्या मतचोरी विरोधातील 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चानंतर आता भाजपकडूनही राजकीय पलटवार सुरू झाला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मतचोरीच्या मुद्यावर विरोधक आरडाओरड करत असले तरी त्यांना वोट जिहादचा पुळका आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुद्दाम विरोधकांकडून हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जात असल्याचा दावा करत हा व्होट जिहाद असल्याचे म्हटले आहे. शेलारांनी वोट जिहाद ही फक्त निवडणूक मोहीम नसून, ही मविआ आणि ठाकरे बंधू यांच्या विरोधातील एक लढा असल्याचे सांगत, याला आता उत्तर बुथपातळीवऊन देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात मतचोरी विरूध्द वोट जिहाद असा आता सामना होणार आहे.

Advertisement

1 नोव्हेंबरला मतचोरी आणि दुबार मतदारांच्या विरोधात राज्यातील विरोधीपक्षाने सत्याचा मोर्चा काढला, या मोर्चात राज्यातील तीनही प्रादेशिक पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे सहभागी झाले. मात्र या मोर्चात सगळ्यात चर्चा झाली ती राज ठाकरे यांची, त्यांनी आपल्या स्टाईलने केलेल्या आरोपांची. राज ठाकरे यांनी काढ रे तो पडदा म्हणत राज्यातील लोकसभा मतदार संघातील दुबार मतदारांचा पंचनामा केला. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसं पाहिले तर विरोधकांकडे कोणताच प्रभावी मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नाही, मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो ंिकवा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असो,हे सगळे विषय निवडणुकीसाठी येतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी आरक्षणाचा विषय असो किंवा इतर विषय ते वेळोवेळी योग्यप्रकारे हाताळले. त्यात महत्त्वाचे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे असलेले पाशवी बहुमत आणि मुठभर विरोधक यांची सांगडच होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात बच्चु कडु यांनी नागपूरात आंदोलन करताना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा सरकारला इशारा दिला. रेल रोको तसेच महामार्गावरील वाहतूक रोखत नागपूरात चक्काजाम पण केला, कडु यांच्यासह आंदोलक आक्रमक झाले, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत चर्चेला आलेले कडु अखेर गोड झाले. सातारा फलटण येथील महिला

Advertisement

डॉक्टर आत्महत्या प्रकरण असो किंवा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अडचणीत आलेले जैन बोर्डींग ट्रस्टच्या जागेचा खरेदी व्यवहार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना बोलण्यास जास्त वाव दिला नाही. मतचोरी प्रकरण हा असा एकमेव मुद्दा आहे, ज्यामध्ये भाजपची बोलली तरी अडचण आणि नाही बोलली तरी अडचण, सत्याच्या मोर्चातून विरोधकांनी हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेले असले तरी, यातून सत्ताधारी पक्षाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी जर हे आंदोलन उभारले असते तर भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीतील पक्षांनी यावर जोरदार टीका केली असती किंवा या आंदोलनातच फुट पाडली असती, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएम हटाव म्हणून मविआचे आंदोलन झाले. पण भाजपने किंवा सत्ताधारी पक्षाने त्याला गांभीर्याने घेतले नाही, त्यात महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या तीन तऱ्हा असल्याने विरोधक म्हणून आत्तापर्यंत कोणत्याच विषयावर त्यांना यश आले नाही. मात्र यावेळी दोन ठाकरे बंधू एकत्र, त्यात शरद पवार पण हे राज्यातील प्रमुख नेते एकत्र आले. त्यामुळे या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र या मोर्चातील महत्त्वाचे आरोप आणि मुद्दे हे मनसे नेते राज ठाकरे यांनी मांडले. कोणत्या मतदार संघात किती मतदार आहेत, हे त्यांनी सांगितले. आता राज ठाकरे यांना शिवसेना शिंदे गटातील कोणता नेता अंगावर घेणार आणि भाजपातील कोणी काय बोलावे तर राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता, सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी अखेर भाजपने प्रवीण दरेकर, नवनाथ बन, चित्रा वाघ, नितेश राणे या सगळ्यांना बाजुला ठेवत मुंबई भाजपचा चेहरा आशिष शेलार यांना  मैदानात उतरवले. शेलार यांनी ठाकरे बंधू आज मतचोरी, संविधान आणि लोकशाही यावर बोलतात, पण हिंदू मतदारांवर होणाऱ्या परिणामांबाबत मात्र मौन बाळगतात. मुद्दाम विरोधकांकडून हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जात असल्याचा दावा करत हा व्होट जिहाद असल्याचे म्हटले आहे. यावेळी शेलार यांनी काही लोकसभा आणि विधानसभा मतदार संघात किती मुस्लिम दुबार मतदार असल्याची संख्याच वाचून दाखवली. 31 विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदारांची संख्या ही 2 लाख 25 हजार आहे. मग तुम्ही व्होट चोरी केली? असा प्रश्न विचारायचा का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. कधी उत्तर भारतीय, कधी मारवाडी कधी गुजराती, कधी जैन मतदारांविरोधात बोलणारे आता मराठी मतदारांना दुबार मतदार बोलत आहेत. मात्र मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मतदारांबाबत मूग गिळुन गप्प का बसले आहेत? असा सवाल उपस्थित करत भाजपने ठाकरे बंधूंना मुळ विचारांशी प्रतारणा करत असल्याचा आरोप केला. मोर्चा काढून आंदोलन कऊन निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. भाजपला मतदार यादीत घोळ असल्याचे मान्य आहे, भाजपची मतदार यादी शुध्दीकरणाची भूमिका देखील आहे, मात्र त्यासाठी दुबार मतदार दिसेल तिथे त्याला बडवा ही आमची भूमिका नाही. प्रचलित पध्दतीनुसार बुथप्रमुख, बुथ एजंट यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत निवडणुकीत सहभाग घेतला पाहिजे. निवडणुकीतून पळ काढण्यासाठी विरोधकांचा हा सगळा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आता मतचोरी तसेच दुबार मतदारांचा मुद्दा जाऊन, लवकरच धर्माच्या आधारावर दुबार मतदारांचे कसे विभाजन झाले, त्याचा फायदा कसा कोणाला झाला, तसेच हिंदु विऊध्द मुस्लिम तसेच अल्पसंख्याक यांच्या मतांवरच आता हा विषय डायव्हर्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त फायदा झाला की आम्हाला दुबार मतदारांचा हा आता महत्त्वाचा विषय आहे, भाजपने विरोधकांच्या मतचोरीच्या विषयावर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना निवडणूक आयोगाला देखील सेफ केले आहे. आता धर्माच्या आधारावर केलेल्या दुबार मतदारांच्या आरोपाला विरोधक काय उत्तर देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात पेरणी नंतर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत, सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असलेल्या दुबार मतदारांच्या आरोपामुळे राज्यावर दुबार मतदारांचे मोठे संकट सध्या तरी घोंगावत आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article