राजकीय हत्याकांड !
राज्यात गेल्या नऊ महिन्यात चार राजकीय हत्या झाल्यात. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या म्हणजेच राजकारणातील हत्याकांड असल्याचे समजले तरी चालेल. वास्तविक राजकारणातील गँगवॉरचा इतिहास पाहिला तर हे बळी पूर्व वैमनस्य, राजकीय स्पर्धा आणि मतदारसंघातील विविध वाद यातूनच गेले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही तर यापुढे असेच चालत राहणार हे मात्र निश्चित.
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने संपूर्ण देश हादरला. दसऱ्याच्या मुहुर्तावर संपूर्ण पोलीस दल बंदोबस्तात सज्ज असतानाच मारेकऱ्यांनी नेमका याचा फायदा घेत आमदार मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकीवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर यामध्ये आणखी एक जण जखमी झाला. बाबा सिद्दीकीच्या मृत्युमुळे मुंबई तसेच राज्यातील राजकीय हत्याकांड पुन्हा सुऊ झाले की काय अशी शंका येण्यास सुऊवात झाली आहे.
राज्यात गेल्या नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी भुरटा गुन्हेगार असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे. त्याप्रकारची पोस्ट देखील त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या अनुज थापन याचा पोलीस कोठडीतील मृत्यूचा बदला बाबा सिद्दीकीच्या हत्येने घेतल्याचा दावा बिश्नोई टोळीने केला. यावेळी ‘खुन का बदला खुन’ असा संदेश या बिश्नोई टोळीने दिला आहे. मात्र या बिश्नोई टोळीला मुंबई पोलिसांचा हिसका माहित नाही. ज्यावेळी सावज टप्यात येईल तेव्हा मुंबई पोलीस करेक्ट कार्यक्रम करणार, हे अद्याप बिश्नोई टोळीला उमगले नसेल. यापूर्वी मुंबईत सुऊ असलेल्या अंडरवर्ल्डच्या कारवाया तसेच नामचिन गुंडाचा मुंबई पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केल्याने आज अंडरवर्ल्डचे नामोनिशान मुंबईतून मिटले आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी तसेच मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक अंडरवर्ल्ड टोळ्यांनी राजकीय हत्याकांड घडविण्यास सुऊवात केली होती. तत्पूर्वी या नऊ महिन्यात राज्यात चार राजकीय हत्या झाल्याने, पोलीस दल सतर्क झाले आहे. केवळ राजकीय सुड आ]िण आपल्याला विनाकारण बलात्काराच्या गुह्यात गोवल्याच्या संशयावऊन उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्याच मतदारसंघात राजकारणात नव्याने उदयाला येत असलेल्या मॉरिस नरोन्हा याने केली. त्यानंतर त्यानेदेखील स्त:ला संपविले. त्यापूर्वी उल्हासनगर येथे भाजपच्या गणपत गायकवाड या आमदाराने शिंदे गटाच्या नेत्याला भर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याची घटना ताजी होती. या सर्व प्रकरणाचा तपास सुऊ असतानाच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अजित पवार गटाच्या भायखळा येथील सचिन कुर्मी या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. तसेच ऐन दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर बाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तप्त झाले आहे. एकामागोमाग एक अशा राजकीय हत्यांचे सत्र सुऊ झाल्याने, मुंबई पोलिस दल खडबडून जागे अर्थात सतर्क झाले आहे. 1990 च्या दशकात सुऊ झालेले राजकीय हत्याकांड मुंबई पोलिसांनी हाणून पाडत अनेक आरोपींना अटक केली होती. त्यानंतर राजकीय हत्या बंद झाल्या होत्या. मात्र या वर्षातील राजकीय हत्या पाहता पोलीस दल पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. वास्तविक पाहिले तर यापूर्वी देखील राजकीय वैमनस्य अथवा स्पर्धेतून अनेक आमदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या देखील अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना आमदार कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.
राज्यातील पहिली हत्या ही शिवसेना आमदाराची मुंबईत झाली होती. परळ भारतमाता चित्रपटगृहाशेजारील इमारतीसमोर राहणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठल चव्हाण यांची 22 मार्च 1992 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी लालबाग-परळ येथे दहशत असलेल्या दुबईस्थित गुऊ साटमच्या इशाऱ्यावऊन बच्चा रावळ, प्रल्हाद पेडणेकर, अनिल देसाई उर्फ आर. के. नितीन आंगणे, संतोष ठाकुर उर्फ पोत्या यांनी हा गेम केला. गँगस्टराकडून एका विद्यमान आमदाराची हत्या होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. यामुळे मुंबई पोलीसच नाही तर राज्य पोलीस आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यापूर्वी म्हणजे 12 जून 1987 रोजी डी.बी. मार्ग येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक ऋषी मेहता यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्यात आले होते. मेहता यांनी अनाधिकृत बांधकामात रस घेतल्याने, त्यांचा गेम करण्यात आला. तसेच शिवडी येथील शिवसेनेचे नगरसेवक विनायक वाबळे यांचा सुरेश मंचेकर या गँगस्टरने खात्मा केला. यावेळी क्राईम ब्रँचने गुऊ साटमची प्रेयसी लक्ष्मी उर्फ लक्का हिच्यासह चार जणांना अटक केली होती. भांडुप परिसरात वर्चस्व असलेला तसेच विक्रमी मतांनी निवडून येणारा शिवसेनेचा नगरसेवक के. टी. थापा याला भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. छोटा राजनच्या इशाऱ्यावऊन दीड डझन गुंडांनी थापाचा गेम केला. थापाचे वाढते वर्चस्व आणि तो वरचढ होत असल्यानेच राजनने त्याचा गेम केला. त्यापूर्वी भांडुप येथेच अऊण गवळीने शिवसेना शाखाप्रमुख माऊती लक्ष्मण हळदणकरची हत्या केली होती. अरूण गवळी आणि हळदणकरचे पूर्ववैमनस्य होते.
तर दुसरीकडे अऊण गवळीने मुस्लिम लिगचे माजी आमदार झियाउद्दीन बुखारी याचा गोळया घालून गेम केला. बुखारीला मारण्यासाठी गवळीने 14 गुंड नागपाड्यात घुसविले होते. यावेळी बुखारीने बॉम्बस्फोट घडवून दगडी चाळ उडविण्याचा कट आखल्याची चर्चा त्यावेळेस जोरावर होती. मात्र खरे कारण अरूण गवळीलाच माहीत आहे. तसेच शिवसेनेची फायरब्रँण्ड महिला नगरसेवक आणि गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी निता नाईक हिची हत्या उघडपणे अश्विन नाईकने केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रमेश मोरे यांची अंधेरी चार बंगला येथे अरूण गवळीच्या इशाऱ्यावऊन गोळ्या घालून हत्या केली. रमेश मोरेंची हत्या म्हणजे शिवसेनेला मोठा हादरा होता. त्यानंतर दोनच दिवसात भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांची खेतवाडीत गाडी आडवी घालून दाऊदचा हस्तक इजाज पठाणने हत्या घडवून आणली.
अशातच गुन्हेगारीच्या क्षेत्रात नव्याने उदयाला येत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने कारागृहात राहुन माजी मंत्री बाबा सिद्दीकीची हत्या घडवून आणली. यामुळे राज्यात सुऊ झालेल्या राजकीय हत्याकांडाला लवकरात लवकर आळा घालणे महत्त्वाचे आहे. ही जबाबदारी पोलीस दल पूर्णत: आपल्या शिरावर घेत यामध्ये यशस्वी होणार हे मात्र निश्चित.
- अमोल राऊत