For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सैनी सरकार पाडण्यासाठी हरियाणात राजकीय खेळ

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सैनी सरकार पाडण्यासाठी हरियाणात राजकीय खेळ
Advertisement

काँग्रेसने मागितली राज्यपालांकडे वेळ : जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र : सरकार वाचविण्यासाठी भाजप प्रयत्नशील

Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

हरियाणातील राजकीय भूकंपानंतर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता हरियाणा काँग्रेसही सैनी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. काँग्रेसने राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली असून शुक्रवारी काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊ शकतात. नुहचे आमदार आफताब अहमद यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. याचदरम्यान सरकार वाचविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले असून जेजेपीच्या काही आमदारांना फोडण्यासाठी छुपी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.  महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणे हरियाणात ‘जेजेपी’ला फोडण्याची तयारी भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. काँग्रेसने सरकारच्या फ्लोर टेस्टची मागणी लावून धरली आहे. भाजप सरकारने बहुमत गमावल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करून लवकर निवडणुका घ्याव्यात, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाच्या राज्यपालांना पत्र लिहिले होते. दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. आम्ही सध्याच्या सरकारला पाठिंबा देत नाही आणि हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे म्हटले आहे. तथापि, हरियाणातील जननायक जनता पक्षात (जेजेपी) फूट पडू शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या धर्तीवर जेजेपीमध्येही ‘भगदाड’ पाडल्यानंतर जेजेपीचे बंडखोर आमदार एकत्र जेजेपीवर अधिकार सांगू शकतात आणि पक्ष तोडू शकतात. पडद्यामागे अतिशय छुप्या पद्धतीने या सर्व घडामोडी सुरू असून दुष्यंत चौटाला यांनीच यासंबंधी भाजपवर संशय व्यक्त केला आहे.

Advertisement

सरकारविरोधात 45 आमदार : भूपेंद्र हु•ा

दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेत एकूण 88 आमदार आहेत. सध्या सैनी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार अल्पमतात असल्याचा दावा भूपेंद्र हु•ा यांनी केला आहे. 30 काँग्रेस, 10 जेजेपी, 3 अपक्ष, बलराज कुंडू आणि आयएनएलडी नेते अभय चौटाला यांच्यासह 45 आमदार सरकारच्या विरोधात असल्याचे भूपेंद्र हु•ा म्हणाले. हु•ा यांनी राज्य सरकारवर नोकऱ्या विकल्याचा आरोप केला. एचपीएसई कार्यालयात करोडोंची रक्कम जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.