For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदानयंत्रात ‘बंद’

06:50 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदानयंत्रात ‘बंद’
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

अनेक चुरशीच्या लढती असणाऱ्या उत्तर कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये आज मंगळवारी मतदान होणार आहे. मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. 14 मतदारसंघांमध्ये 227 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य आज मतदार निश्चित करणार आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा या मतदारसंघात मतदान होणार आहे. येथे एकूण 227 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2,59,52,958 मतदार मतदानासाठी पात्र असून 28,269 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी सर्व 14 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. तर बसपने 9, नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी 73 आणि 117 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 206 पुऊष आणि 21 महिला उमेदवार आहेत.

Advertisement

सोमवारी निवडणूक साहित्यासह कर्मचारी नियोजित मतदान केंद्रांवर विशेष बसने रवाना झाले. सुरक्षेसाठी 40 हजारहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे निमलष्कारच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे 3,78,144 युवा पुरुष आणि 3,12,703 युवा महिला मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचप्रमाणे 85 वर्षांवरील 2,29,263 वृद्ध आणि 3,43,966 दिव्यांग मतदारही मतदानाचा हक्क बजावत आहेत.

भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र,   खासदार भगवंत खुबा, पी. सी. गद्दीगौडर, विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, काँग्रेसतर्फे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी, माजी आमदार अंजली निंबाळकर, अपक्ष उमेदवार माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा असे अनेक नेते दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत

Advertisement
Tags :

.