राज्यात राजकीय भूकंप? विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे ११ आमदारांसह नॉट रीचेबल
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. त्यातूनच शिवसेनेचे नेते (shivsena) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (cabinet ministar eknath shinde) नाराज असल्याने ते ११ आमदारांना (11 MLA) घेऊन अज्ञात स्थळी आहेत. सकाळपासून ते नॉटरिचेबल (not rechabale) असून आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरात मधील सुरत(gujrat state in surat) मध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून राज्यात मोठी घडामोड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर सहाजिकच महाविकासआघाडी मधील वातावरण ढवळून निघाले आहे. काल रात्रीपासून शिवसेनेमध्ये बैठका सुरू असून आज सकाळपासून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे अकरा आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. ते सुरत मधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार काय? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दुपारी एक नंतर एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वारस का फिरलं? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच समजणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह गुजरातमधील सुरत येथील ली मेरिडियन हॉटेल मध्ये असून त्या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.