For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणामध्ये राजकिय भुकंप! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

03:49 PM Mar 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
हरियाणामध्ये राजकिय भुकंप  मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांच्या युतीमध्ये राजकिय वादळ निर्माण झाले असून राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासह त्यांच्या मंत्रिमंडळाचाही राजीनामा हरियाणाचे राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला आहे. खट्टर यांच्यानंतर भाजपचे ताकदवर नेता नायब सिंग सैनी हे हरियाणाचे नविन मुख्यमंत्री होणार असून आज सायंकाळी ते मंत्रिपदाची शपथ घेतील.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा राज्यामध्ये राजकिय तणाव गेल्या काही दिवसांपासून दिसून येत होता. राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि जजप यांच्यामधील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस चिघळत चालला असून त्यामुळेच राज्यात राजकिय भुंकप आला असल्याचं बोललं जात आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.

जागावाटपावरून तणाव
लोकसभेच्या 10 जागा असलेल्या हरियाणामधून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे येत्या लोकसभेसाठी भाजपने हरियाणातील सर्वच्या सर्व 10 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे भाजपचा सहयोगी पक्ष जननायक जनता पक्षाने जोरदार विरोध करत 2 जागांवर दावा केला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतरही आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा भाजपने केला आहे. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपचे 41 आमदार असून त्यांना 5 अपक्ष आमदार आणि HLP आमदार गोपाल कांडा यांचाही पाठिंबा आहे.

हरियाणामधील घडामोडीवर भाष्य करताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा यांनी आम्हाला माहितच होतं की भाजप- जेजेपी युती केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी केली गेली आहे असं म्हटलं आहे.

Advertisement
Tags :

.