For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tuljapur Politics : तुळजापूरमध्ये राजकीय वादातून हिंसाचार, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

05:07 PM Dec 17, 2025 IST | NEETA POTDAR
tuljapur politics   तुळजापूरमध्ये राजकीय वादातून हिंसाचार  भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Advertisement

                                          तुळजापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी

Advertisement

तुळजापूर : शहरातील जनता बँकेसमोर रस्त्याच्या कामावरून झालेल्या बाचाबाचीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये भाजप कार्यकर्त्याकडून गोळीबार झाल्याची चर्चा शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात बाचाबाचीतून वाद झाल्याचे समजते. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोरआले. रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. रस्त्यावर गोंधळ झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Advertisement

तणावाचे वातावरण झाल्यामुळे गोलाई परिसरातील काही काळ व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर हा वाद संपुष्टात आल्याचे सांगितले. थोड्यावेळाने हॉस्पिटलसमोर कुलदीप मगर यांच्यावर कोयत्यांनी डोक्यात तीन वार झाल्यानंतर पुन्हा हा वाद पेटला. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कुलदीप मगर यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सोलापूर येथे रॅपर करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय येथे प्रशासनास नागरिकांनी घेरावा घालून नागरिकांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली. पोलिसांनी नागरिकात झालेल्या बाचाबाचीमुळे काही वेळ उपजिल्हा रुग्णालय समोरील रोडवर झालेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. शहरात नळदुर्ग रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॅन्ड परिसर, विश्वनाथ कॉर्नर लातूर रोड भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केले.

पोलिसांकडून तगडा बंदोबस्त
पोलीस प्रशासनाच्यावतीने चौका चौकात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.

Advertisement
Tags :

.