For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मांजा विक्रीविरोधात पोलिसांची कठोर कारवाई

06:10 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मांजा विक्रीविरोधात पोलिसांची कठोर कारवाई
Advertisement

बाजारपेठेतील दुकानांमध्ये कसून तपासणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावनंतर हुबळी-धारवाड या जुळ्या शहरात मांजाने एका महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेनंतर बेळगाव पोलिसांनी मांजा विक्रेत्यांविरुद्ध पुन्हा एकदा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहर व उपनगरातील दुकानांमध्ये शुक्रवारी मांजासाठी तपासणी करण्यात आली आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या सूचनेवरून पतंग विक्रेते, किराणा दुकाने, स्टेशनरी दुकानांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. जीवघेणा मांजा विक्री करू नये, अशी सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे. पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली परिसरात काही दुकानांवर छापे टाकून मांजाही जप्त करण्यात आला आहे.

बेळगावात मांजाने एका मोटरसायकलस्वाराचा बळी घेतल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली होती. 1 ऑक्टोबर रोजी 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वत्र मांजासाठी शोधमोहीम राबविली होती. या घटनेपाठोपाठ गुरुवारी हुबळी येथील श्री सिद्धारुढ मठाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा मांजाने बळी घेतला होता.

हुबळी येथील घटनेनंतर पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सातत्याने सूचना देऊनही जीवघेण्या मांजाची विक्री कोणी करत असेल तर अशा दुकानदारांविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.