Tasgaon police action | तासगावात पोलिसांचा मोठा अॅक्शन मोड! 'त्या' आवाजाने हैराण तासगावकरांना अखेर दिलासा!
तासगावकरांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांची कारवाई
तासगाव -तासगाव शहरात धावणाऱ्या दुचाकी बाहनांचे कर्णकर्कश हॉर्न तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून केलेल्या कर्णकर्कश आवाजाने तासगावकर हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर 'तरुण भारत संवाद ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तासगाव पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.बुलेट, स्प्लेंडरसह इतर वाहनांचे हॉर्न व सायलेन्सर काढण्यात आले असून २० हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सर आवाजाने तासगावकर अक्षरश: हैराण झाले आहेत विशेषता महिलावर्ग या आवाजाने हैराण झाला आहे अशी हिरोगिरी करणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवा अशी मागणी होत आहे. सोमवारी 'तरुण भारतसंवाद ने कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरने तासगावकर हैराण, अनेकांना धडकी भरेल असा आवाज हिरोगिरी नकोः पोलीस कारवाईची मागणी असे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
निरीक्षक विशाल टकले, वाहतूक शाखेचे अधिकारी उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार विशाल खेराडकर, अजय चिवटे, महिला पोलीस दिपाली खरात, संदीपभंडारे, पोलीस स्टेशनचे अरुण पाटील निलेश डोंगरे यांनी अशा वाहनांच्या वर आक्रमक पवित्रा घेत कारवाई केली.
तासगाव पोलिसांनी बुलेट, स्प्लेंडर सोमवारी व इतर अशी नऊ वाहने ताब्यात घेऊन त्यांचे कर्णकर्कश हॉर्न सायलेन्सर मिस्त्रींच्या मदतीने काढले. व त्यांच्यावर बीस हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली. अशा वाहनांच्यावर यापुढेही कारवाई होणार असल्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सांगितले