कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेकायदा दारूविक्रीविरोधात पोलिसांची धडक कारवाई

12:24 PM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नंदिहळ्ळी-संतिबस्तवाडमध्ये दोन अड्ड्यांवर छापे टाकून दारू जप्त

Advertisement

बेळगाव : मटका, जुगारापाठोपाठ बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नंदिहळ्ळी व संतिबस्तवाड येथील दोन अड्ड्यांवर छापे टाकून बेकायदा दारू जप्त केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी नंदिहळ्ळी येथील वाकडेवड्ड रोडवर बेकायदा दारू विकणाऱ्या देवाप्पा बाळाप्पा लोकुर, राहणार नंदिहळ्ळी याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून 3 हजार 650 रुपये किमतीची बेकायदा दारू व 450 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नावगेजवळ दारू विकणाऱ्या राजेंद्र फकिरा मेलगे याला ताब्यात घेऊन प्रत्येकी 90 मिलिच्या 60 टेट्रापॅक व्हिस्की, आणखी एका कंपनीच्या 5 टेट्रापॅक, वेगळ्या कंपनीच्या रम व व्हिस्कीच्या 27 टेट्रापॅक असा एकूण 5,840 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article