For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News | पंढरपुरात अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; देगाव परिसरातून जेसीबीसह दोन टिपर जप्त.

05:39 PM Mar 16, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur news   पंढरपुरात अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक  देगाव परिसरातून जेसीबीसह दोन टिपर जप्त
Advertisement

                        पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई

Advertisement

पंढरपूर -देगाव (ता. पंढरपूर) येथे देगाव ते बाभुळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळूच्या साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टिपर, एक जेसीबी व आठ ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांचे कार्यालयाकडील पोलीस पथकातील पोलीस अंमलदार हे देगाव येथे गेले. देगाव ते बाभुळगाव जाणारे रोडवर यादव यांच्या वीट भट्टीजवळ मोकळ्या जागेत वाळू साठा दिसून आला. वाळू जेसीबी मशीनच्या साह्याने दोन टिपर वाहनात भरत असल्याचे दिसून आले. तेव्हा टिपर आणिजेसीबी चालकास जागीच पकडण्यात आले.

Advertisement

जेसीबी चालक प्रवीण नानासाहेब बोराटे (वय ३५, रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर) तसेच टिपरचालक विश्वास हनुमंत चव्हाण (वय ४३, रा. सुस्ते, ता. पंढरपूर), तर मालक बालाजी मारुती पवार (रा. देगाव) असे असल्याचे सांगितले. तर टिपर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी टिपर हे सोमनाथ जाधव (रा. देगाव) यांचे मालकीची असल्याचे सांगितले. दोन टिपरमध्ये प्रत्येकी ४ ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले. त्यापैकी एक टिपर (डब्ल्यू बी ५३ बी १४३०) व दुसराटिपर (एमएच १३ डिक्यू २८५८) व बिगर क्रमांकाचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. यावेळी आठ ब्रास वाळू साठा मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी ग्राम महसूल अधिकारी डी. बी. कोताळकर यांना बोलावून माहिती देऊन पुढील कारवाईकामी त्यांच्या ताब्यात वाळू साठ्यासह दिले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोडेकॉ रोकडे, खिलारे, रोंगे, पोना शिंदे, पोकों हुलजंती लोंढे यांनी पार पाडली आहे.

Advertisement
Tags :

.