For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस उपनिरीक्षकांकडून साहाय्यक उपनिरीक्षकाला थप्पड

10:26 AM Feb 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोलीस उपनिरीक्षकांकडून साहाय्यक उपनिरीक्षकाला थप्पड
Advertisement

गोकर्ण महाबळेश्वर मंदिर आवारातील घटना : भाविकांच्या समोरच घडलेल्या प्र्रकारामुळे चर्चा

Advertisement

कारवार : गोकर्ण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी भटकळ शहर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक उपनिरीक्षकांना थप्पड मारल्याची घटना बुधवारी गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिराच्या आवारात घडली आहे. महाबळेश्वर मंदिरातील आत्मलिंगाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या शेकडो भाविकांच्या समोरच घडलेल्या या घटनेची चर्चा सर्वत्र चर्चिली जात आहे. थप्पड मारलेल्या उपनिरीक्षकांचे नाव खादर बाशा असे आहे. तर थप्पड खालेल्या साहाय्यक उपनिरीक्षकांचे नाव जयराम होसकट्टा असे आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, बुधवारी महाशिवरात्रीच्यानिमित्ताने गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरातील आत्मलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देवदर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तरीसुद्धा मूळचे गोकर्ण आणि सद्याला भटकळ शहर पोलीस ठाण्यात साहाय्यक उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणारे जयराम होसकट्टा सर्व सामान्यांसाठी असलेल्या रांगेत देवदर्शनासाठी सहकुटुंब थांबले होते.

त्यावेळी रांगेत थांबलेल्या भाविकांनी देवदर्शनासाठी लवकर लवकर सोडा अशी मागणी तेथे ड्युटी बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे केली. यावेळी भाविक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यां दरम्यान किरकोळ वाद झाला. तरीसुद्धा त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती फोनवरुन उपनिरीक्षक खादर बाशा यांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या बाशा यांनी होसकट्टा यांना भाविकांच्यासमोर थप्पड मारली. इतकेच नव्हे तर बाशा यांनी होसकट्टा यांना दर्शन रांगेतून हाकलून दिले. त्यावेळी होसकट्टा यांनी आपण वाद घातला नाही किंवा महिला कर्मचाऱ्यांशी भांडण केले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण बाशा ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. होसकट्टा यांच्या कुटुंबियांनीही बाशा यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही एक उपयोग झाला नाही. ही घटना सोशल मीडियावर वायरल झाली आहे. व जिल्ह्यात चर्चिली जात आहे. आता पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.