For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कर्नाटकात जाणाऱ्या खासदार मानेंना पोलिसांनी रोखले अन्...!

11:53 AM Nov 02, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   कर्नाटकात जाणाऱ्या खासदार मानेंना पोलिसांनी रोखले अन्
Advertisement

                    मराठी बांधवांना भेटायला गेलेल्या मानेंना अटक

Advertisement

कागल : शनिवारी १ नोव्हेंबर रोजी कर्नाटकात झालेला राज्योत्सव दिन सीमा भागातील मराठी बांधवांनी काळा दिन म्हणून पाळला. या पार्श्वभूमीवर सीमा भागातील बांधवांना भेटण्यासाठी निघालेले खासदार धैर्यशील माने, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, कार्यकर्त्यांसह कर्नाटकात चालले होते, त्यांना कर्नाटक पोलिसांनी कागलच्या दूधगंगा नदीवरील पुलावर रविवारी रोखले आणि सीमाभागात जाण्यास मज्जाव केला, यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची झाली. खासदार पाने, पवार, देवणेंसह कार्यकर्त्यांना कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, आम्ही शांततेच्या मानि मराठी भाषिकांना भेटण्यासाठी कर्नाटकात चाललो होतो. मात्र नोटीसा काढून भाषाबाद आणि प्रांतवाद पेटवण्याचे काम प्रशासन करत आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकातील राज्योत्सवात जाऊन शांतता भंग करू नये याकरिता खासदार माने, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख पवार, देवणे, सुनिल मोठी, सुनिल शिंत्रे यांच्यासह २५ जणांच्या विरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश काढला होता.

Advertisement

हा आदेश डावलून शिवसेना पवार, देवणे आणि सुनिल मोदी सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यासह घोषणा देत कागल येथील दूधगंगा पुलावर आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांसह कागल पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कर्नाटकात जाणारी प्रवासी वाहने तपासून सोडली जात होती.

शिवसेनेचा जयघोष आणि कर्नाटक शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत दूधगंगा नदी पूल ओलांडून कर्नाटकात प्रवेश करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना कागल पोलिसांनी पुलाच्या अलिकडच रोखले. यावेळी कार्यकर्ते आणि कागल पोलिसात बाद झाला. आम्ही कर्नाटकातील मराठी भाषिकांना भेटण्याकरिता जात आहोत. कर्नाटक पोलिसांनी आम्हाला रोखण्याऐवजी महाराष्ट्र पोलीस आम्हाला रोखत आहेत, हे दुर्दैवी असल्याची भावना संजय पवार, विजय ठेवणे यांनी व्यक्त केली.

कर्नाटक, महाराष्ट्र पोलिसांचा निषेध

यावेळी कार्यकर्त्यांनी बंदोबस्त झुगारून कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. असता त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. तर कागल पोलिसांनी त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात आणले. महाराष्ट्र पोलिसांची ही दादागिरी असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक पोलिसांचा निषेध केला. दरम्यान, कारमधून कर्नाटकात प्रवेश केलेल्या खासदार धैर्यशील माने यांना दूधगंगा नदीवरील पूलावर कर्नाटक पोलिसांनी रोखले. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला प्रवेशबंदीची नोटीस दिली आहे. त्यामुळे तुम्हाला कर्नाटकात जाता येणार नाही,

अशी भूमिका कर्नाटक पोलिसांनी घेतली. यावेळी खासदार माने यांनी आपण संविधानिक पदावर कार्यकरत असून कोणतीही बॅनरबाजी न करता शांततेच्या मार्गाने मराठी बांधवांना भेटण्याकरिता कर्नाटकमध्ये जात आहोत. घटनेने नागरीकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा अधिकार दिला आहे. मात्र भाषावाद आणि प्रांतवाद कोण वाढवत आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली नोटसीच त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. आम्हाला प्रवेश दिला जात नाही, तोपर्यत आपण येथून हलणार नाही, अशी भूमिका घेत खासदार माने यांनी पुलावर ठिय्या मारला. त्यामुळे काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला.

आम्ही मराठी भाषिकांबरोबर असून आमच्या भावना आणि संवेदना त्यांच्याबरोबर आहेत. संविधानिक पदावर काम करणाऱ्याला अशी नोटीस दिली जात असेल तर हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप खासदार मानेंनी केला. दरम्यान, कागल पोलिसांनी खासदार माने यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणले. आंदोलना दरम्यान कागलहून निपाणीच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.