‘लड्डू गोपाल’च्या शोधात पोलीस
सध्या मध्यप्रदेशातील पोलीसांवर एक महत्वाचे उत्तरदायित्व येऊन पडले आहे. ते ‘ल•t गोपाल’चा शोध गेल्या पाच महिन्यांपासून घेत आहेत. हा ‘लड्डू गोपाल’ या राज्यातील ग्वाल्हेर येथे वास्तव्यास असणाऱ्या विजया शर्मा यांचा आहे. 20 जानेवारी 2026 या दिवशी विजया शर्मा बाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्यासह हा ‘लड्डू गोपाल’ होता. बाजारात तो कोठेतरी हरवला. शर्मा यांनी त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. आपल्या ओळखीच्या दुकानदारांकडेही विचारणा केली. तथापि, तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. आता ग्वाल्हेरचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शोध घेण्यासाठी त्यांनी तीन पथकेही स्थापन केली असून ती कार्यरत आहेत.

आता, ‘ल•t गोपाल’ ही संकल्पना काय आहे, हे समजल्यानंतरच या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. भारतात सर्वत्र बालरुपातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय लोकप्रिय असते. ही मूर्ती रांगणाऱ्या, उभ्या किंवा लोण्याचा गोळा हाती धरलेल्या स्थितीत असते. बहुतेकांच्या देव्हाऱ्यात ती असते आणि तिची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रात ही मूर्ती ‘बाळकृष्ण’ या नावाने परिचित असते. तर तिला उत्तर भारतात बव्हंशी स्थानी ‘लड्डू गोपाल’ असे म्हणतात. असा हा ‘लड्डू गोपाल’ विजया शर्मा यांनी त्यांच्या माहेरच्या लोकांनी भेट दिला होता. त्याला त्या नेहमी आपल्यासह ठेवत. त्या बाहेर गेल्या तरी तो त्यांच्यासह असे. या मूर्तीवर त्यांची इतकी भक्ती जडली होती, की त्या त्याला नेहमी आपल्यापाशी ठेवत.
असा हा ‘लड्डू गोपाल’ बाजारात कोठेतील हरविल्यामुळे त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांना मोठाच मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी तो शोधून काढण्याचा चंगच बांधला आहे. त्यांनी आपला ‘लड्डू गोपाल’ हरविल्याची तक्रार तर सादर केली आहेच. पण त्या नेहमी पोलिसांकडे चौकशी करुन आपल्या तक्रारीवरील कारवाई कोठपर्यंत आली आहे, याची चौकशी करत राहतात. त्यांनी स्वत:चे प्रयत्नही सोडलेले नाहीत. या घटनेला आता पाच महिने झाले आहेत. अद्याप त्यांना ‘लड्डू गोपाल’ सापडलेला नाही. पण त्यांनी धीर सोडलेला नाही. त्या नेहमी पोलिसांकडे चौकशी करत असल्याने पोलिसांनाही स्वस्थ बसता येईनासे झाले आहे. त्यामुळे या ‘ल•t गोपाल’चा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.