For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : मोरेवाडी-पाचगाव-कळंबा परिसरात पोलिसांचा रूट मार्च

06:19 PM Feb 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   मोरेवाडी पाचगाव कळंबा परिसरात पोलिसांचा रूट मार्च
Advertisement

                        करवीर पोलीस व होमगार्डने निवडणूक काळात कडक बंदोबस्त

Advertisement

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलामार्फत रूट मार्च काढण्यात आला. करवीर पोलीस ठाणे हद्दीतील मोरेवाडी, पाचगाव व कळंबा परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवडणुकीच्या काळात संभाव्य अनुचित प्रकारांनाआळा घालणे, मतदारांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

रूट मार्चदरम्यान संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तसेच कुठल्याहीप्रकारच्या अफवा, अराजकता किंवा गैरप्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

निवडणूक काळात करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अवैध दारू, पैसे वाटप, आचारसंहिता भंग यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. सदर रूट मार्चमुळे परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.