For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पोलीस रूट मार्च

05:35 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पोलीस रूट मार्च
Advertisement

                            सातारा पोलिसांचे निवडणूक काळातील विशेष सुरक्षा उपक्रम

Advertisement

सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने प्रतापसिंहनगर व खेड परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये शहर पोलीस, दंगल नियंत्रण पथक व इतर विशेष पथकांचा समावेश होता.

Advertisement

प्रतापसिंहनगर आणि खेड हा भाग निवडणुकीच्या काळात संवेदनशील मानला जात असल्याने संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच समाजकंटकांना स्पष्ट संदेश देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. गल्लीबोळातून, मुख्य रस्त्यांवरून व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत नागरिकांशी संवाद साधला. या रूट मार्चमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.