Murugud election : मुरगूड नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलिसांचा रूट मार्च!
निवडणूक पार्श्वभूमीवर मुरगूडमध्ये पोलिसांचे संचलन
मुरगूड : मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सकाळी मुरगूड शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. दंगल काबूची रंगीत तालीमही करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीमचा आशय व उद्देश समजावून सांगण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शहरातून रूट मार्च घेण्यात आला.
दंगल काबूची प्रात्यक्षिके पार पडल्यानंतर मुरगूड एसटी स्टँडपासून तुकाराम चौक, जमादार चौक, पाटील कॉलनी, शिवतीर्थ मुरगूड, मुरगूड नाका, मुख्य बाजारपेठ, कबरस्थान मशीद रोड या मार्गावरुन कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला.
दंगल काबू योजना व रूट मार्च करीता मुरगूड पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी, २५ पोलिस अंमलदार, करवीर पोलीस ठाण्याकडील २ अंमलदार व एसआरपीएफ कडील १ अधिकारी, ७ अंमलदार व २० होमगार्ड सहभागी झाले होते. याबरोबरच मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व अॅम्बुलन्स पथक, नगरपरिषदेचे अग्निशामक दल पथक तैनात ठेवण्यात आले होते.