For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दागिने चोरी प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी

02:49 PM Mar 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
दागिने चोरी प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी
Advertisement

मालवण येथील घटना ; सरकार पक्षातर्फे ॲड. नितीन कुंटे यांनी मांडली बाजू

Advertisement

प्रतिनिधी । मालवण

मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरी प्रकरणातील संशयित अमृता अमर म्हापणकर रा .कुंभारमाठ ता. मालवण आणि राघो सूर्यकांत राऊत, रा .सुकळवाड ता. मालवण यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. दि १७ जानेवारी २०२६ रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीच्या घरात आलेल्या संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलोसांचा तपास सुरु असताना संशयित अमृता अमर म्हापणकर व राघो सूर्यकांत राऊत यांनी मे. सत्र न्यायालय ओरोस येथे दाखल केलेला अटकपूर्व जामीन मे. न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मालवण पोलीसांनी संशयीताना ताब्यात घेतले होते. मालवण पोलिसांनी दि. २३ मार्च २०२५ रोजी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर केले व गुन्ह्याचे तपासाकरीता 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली.सुनावणीअंती तपासकामात संशयितांची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास मालवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री .खाडे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.