For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस भरती परीक्षार्थींमुळे रेल्वेस्थानकात गर्दी

06:48 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलीस भरती परीक्षार्थींमुळे रेल्वेस्थानकात गर्दी
Advertisement

बससह खासगी वाहनांनी परीक्षार्थी शहरात

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : कर्नाटक पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा रविवारी शहरासह इतर भागात घेण्यात आली. या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी बेळगाव, हुबळी या परिसरात दाखल झाले होते. यामुळेच शनिवारी तसेच रविवारी सकाळी रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली होती. काही रेल्वेंच्या जनरल डब्यामध्ये जागा नसल्याने लोंबकळत परीक्षार्थींनी प्रवास केला.

Advertisement

पोलीस भरतीची लेखी परीक्षा शहरातील अनेक केंद्रांवर होती. एकूण 19 हजार 908 परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. जिल्हाभरातील परीक्षार्थी बस, रेल्वे व खासगी वाहतुकीने बेळगाव शहरात आले होते. काही परीक्षार्थींनी आपल्या जिल्ह्याऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शनिवारी रात्री मिरज-बेंगळूर राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये तुफान गर्दी झाली होती. स्लीपर व जनरल डब्यामध्ये पाय ठेवण्यासही जागा उपलब्ध नव्हती.

रविवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात परीक्षार्थींची मोठी गर्दी दिसून आली. त्याचबरोबर मिरजहून बेळगावकडे येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस फुल्ल होत्या. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिसून आली. परीक्षार्थी व त्यांचे पालक खासगी वाहनांनीही शहरात आल्याने रिक्षाचालकांची चांदी झाली. त्यामुळे पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर एखादी अतिरिक्त रेल्वे सोडणे आवश्यक होते.

Advertisement
Tags :

.