महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तेरेखोल लाचखोरी प्रकरणात पोलीस राजू कळंगुटकरला अटक

12:22 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे मागितली लाच : एसीबीने केलेली ही दुसरी अटक

Advertisement

पणजी : तेरेखोल येथे पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) केरी किनारी विभाग पोलीस स्थानकात काम करणाऱ्या आणखी एका पोलीस हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर याला काल सोमवारी अटक केली आहे. पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे लाच मागितल्या प्रकरणाचा तपास एसीबी  करीत असून या अगोदर हवालदार संजय तळकर याला शुक्रवार दि. 12 रोजी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना आणखी एक हवालदार या प्रकरणात गुंतला असल्याचे समजताच त्याची प्राथमिक चौकशी करून त्यालाही अटक केली आहे. संजय तळकर याच्या विरोधात पृथ्वी एच. एन. या पॅराग्लायडिंग व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी केरी किनारी पोलीस स्थानकाचा हवालदार संजय तळकर यांनी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन एसीबीचे उपअधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मेलिटो फर्नांडिस यांनी तळकर याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू  करून त्याला निलंबित केले होते. कार्यालयीन तपास झाल्यानंतर संजय तळकर याला अटक होणार होती. याबाबत तळकर याला माहिती मिळताच त्याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संजय तळकर याच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने तळकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर एसीबीने संजय तळकर याला रितसर अटक केली. एसीबीने पुढील तपास करताना या प्रकरणात हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर याला अटक केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article