For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala News | पन्हाळ्यात ऑनलाइन मुंबई मटक्यावर पोलिसांचा छापा; १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

05:43 PM Aug 28, 2026 IST | NEETA POTDAR
panhala news   पन्हाळ्यात ऑनलाइन मुंबई मटक्यावर पोलिसांचा छापा  १ ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

पन्हाळा : पन्हाळा पोलिसांनी मुंबईमटका या ऑनलाईन जुगाराबर धडक कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेत सुमारे १,६१,२१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शुभम यशवंत जाधव (बय २९, रा. तिरपण, ता. पन्हाळा) याच्याविरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मौजे तिरपण येथील यशवंत गणपती जाधव यांच्या नवीन घराच्या बांधकामामागील मोकळ्या जागेत आरोपी ऑनलाईन पद्धतीने मुंबई मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पन्हाळा पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून स्कॅनरद्वारे पैसे स्वीकारून मटका जुगाराचे आकडे नोंदवत असल्याचे तसेच युट्यूबवरील महाकालचॅनेलचा वापर करून जुगाराशी संबंधित व्यवहार प्राथमिक झाले. माहितीच्या आधारे करत चौकशीत असल्याचे उघडकारवाई दरम्यान, पोलिसांनी आकडेवारी लिहिलेली चार बुक, दोन स्कॅनर, विविध बँक खात्यांमधील व्यवहाराची माहिती, पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉ प तसेच ऑनलाईन व्यवहारातील रक्कम असा एकूण १,६१,२१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र राजाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.