सावंतवाडीत अवैध गुटख्यावर पोलिसांचा छापा; 95 हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी शहर वार्ताहर : सावंतवाडी बाजारपेठेत पोलीस पथकाने छापा टाकून अवैद्यरित्या ठेवण्यात आलेला सुमारे 95 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची पाकिटे असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दुकान चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गांधीचौक जवळ एका दुकानात करण्यात सदरच्या दुकानात अवैद्यरित्या गुटखा व तंबाखूजन्य वस्तूंचा माल ठेवल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पोलीस हवालदार संजय कोरगावकर, अनिल धुरी, महेश जाधव यांच्या सह पथकाने बुधवारी पहाटे दुकानात जवळ छापा टाकून अवैधरीत्या गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने सावंतवाडी बाजारात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी ठेवणे, साठा करून ठेवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस ठाण्यात सदरची गुन्ह्याची कारवाई प्रक्रिया सुरू आहे.