For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | परराज्यातील 'त्या' दोन तरुणींचे गुपित; विरवडे गावातील हॉटेलमध्ये नेमकं काय सुरू होतं?

05:32 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   परराज्यातील  त्या  दोन तरुणींचे गुपित  विरवडे गावातील हॉटेलमध्ये नेमकं काय सुरू होतं
Advertisement

                                 कराडमधील हॉटेल 'शुक्रतारा'वर मध्यरात्री पडली धाड

Advertisement

सातारा - सातारा पोलीस यांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत कराड उपविभागीय पोलीस पथकाने तळबीड हद्दीत अवैध वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन परराज्यातील पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध वेश्या व्यवसायाविरुद्ध कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मौजे विरवडे (ता. तळबीड) येथील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

Advertisement

माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान हॉटेल व्यवस्थापक सुरज मारुती सावंत (वय २७, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा दोन महिलांमार्फत अवैध व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही पीडित महिलांची सुटका केली.या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करत आहेत.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी कारवाई पथकाचे कौतुक करून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला.

Advertisement
Tags :

.