For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ichalkaranji Crime | इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मध्यरात्री छापा; ३४ जणांना बेड्या, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

04:04 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
ichalkaranji crime   इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मध्यरात्री छापा  ३४ जणांना बेड्या  ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

                             इचलकरंजीत मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;

Advertisement

इचलकरंजी : शहरातील आवळे मैदान परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यरात्री छापा टाकत ३४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ लाख ९८ हजार ६१० रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ९१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात मोहीम सुरू असताना पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. तानाजी विष्णू आवळे (आवळे गल्ली, इचलकरंजी) हा आपल्या घरात अंदर-बाहर जुगार चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने सोमवारी यावेळी तानाजी आवळे याच्यासहऋषीकेश यादव (रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), युवराज मोडीकर (रा. कनान नगर, कोल्हापूर), विक्रम कुलकर्णी (रा. संत मळा, इचलकरंजी), संदिप कोंडेकर (रा. गुरुकन्नननगर), फिरोज शेख (रा. जवाहरनगर), प्रितम पाटील (रा. नेहरूनगर), उमेश खाडे (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), विशाल खोत (रा. विक्रमनगर), राहुल पाटील (रा. अवधूत आखाडा), संग्राम पाटील (रा. विक्रमनगर), आरिफ शेख (रा. कदमवाडी, कोल्हापूर), नितीन शिंदे (रा. लाल शफिक मुतवली (रा. मिरज), मुबारक शिरोळे (रा.तौफिक परवेगार (रा विकमनगर), बापू सलगर (रा. सांगली), संकेत आवळे (रा. सांगलवाडी), अक्षय पाटील (रा. चंदूर), महंमद नदाफ (रा. आसरानगर), विजय आळंदे (रा. आर के नगर), रमेश डोईफोडे (रा. गांधी कॅम्प), मस्तान तहसिलदार (रा. विक्रमनगर), सर्फराज चाऊस (रा. विक्रमनगर), भरत सुर्यवंशी (रा. शहापूर), राजू हेदुरे, (रा. दत्तनगर), पार्थ काकडे (रा. गोसावी गल्ली), मेहबूब कुडचीकर (रा. गोसावी गल्ली), राजाराम वडर, उमेश मोटे (दोघे रा. भाटले मळा), स्वप्निल(रा. लालनगर), अहमद इनामदार (रा. स्वामी मळा), योहान लोखंडे (रा. नेहरूनगर), यांच्यासह इतर संशयित जुगार खेळताना आढळले.

Advertisement

यात एकूण २८ मोबाईल, रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. सर्व संशयितांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्वानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार सागर चौगुले, महेश पाटील, नवनाथ कदम, महेश खोत व तौफिक बाणदार यांनी

Advertisement
Tags :

.