For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत पोलिसांचे पथसंचलन

11:52 AM Nov 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत पोलिसांचे पथसंचलन
Advertisement

वार्ताहर / आंबोली            

Advertisement

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबोली बाजारपेठेत रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी फॉरेस्ट चेक नाका ते जकातवाडी पर्यत सावंतवाडीचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवान यांनी पथसंचलन केले निवडणूक कालावधीत मतदारांनी बाहेर पडून निर्भयपणे मतदान करावे, पोलीस तसेच सुरक्षा दलाचे जवान सदैव आपल्या सहकार्यासाठी आहेत या साठीच आंबोली बाजारपेठेतून  बसस्थानक परिसरातून हे पथसंचलन करण्यात आले. आंबोलीत आता पर्यतच्या निवडणूक काळातील हे पहिलेचे पथसंचलन आहे. या पथसंचलनात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो. नि. अमोल चव्हाण, सहाय्यक . पो. निरीक्षक. संजय काठीवाले, सहाय्यक पो. उपनिरीक्षक शरद देठे,१२ पोलीस अंमलदार तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे सहा अधिकारी, ९४ जवान सामिल झाले होते. यावेळी बोलताना सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पो.नि. अमोल चव्हाण म्हणाले विधान सभेची निवडणूक जवळ आली असून निवडणूक काळात मतदारांनी न घाबरता बाहेर पडून आपले मतदान करावे. यावेळी पोलीस यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सदैव आपल्या मदतीसाठी आणि आपल्या सहकार्यासाठी , सुरक्षेसाठी साठी सदैव तत्पर आहेत या जनजागृतीसाठी हे पथसंचलन करण्यात आल्याचे ते म्हणाले . या नंतर दाणोली नागझरी ते संपूर्ण दाणोली बाजारपेठ पेठेत पथसंचलन करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण चव्हाण म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.