महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलीस संचलन

12:14 PM Nov 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वार्ताहर/ कुडाळ

Advertisement

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात गुरूवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने संचलन करण्यात आले. यात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सशस्त्र पोलीस दल या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. कुडाळ पोलीस ठाणे येथून या रूट मार्चला सुरूवात करण्यात आली. जिजामाता चौक, गांधीचौक, बाजारपेठ मार्गे परत पोलीस ठाणे असा हा रूट मार्च काढण्यात आला.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article