महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी, दोडामार्ग ,वेंगुर्लेत पोलीस पाटील पदाची अर्ज प्रक्रिया उद्यापासून

01:11 PM Nov 21, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

किती पदांसाठी होणार पोलीस पाटील भरती ?

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी, दोडामार्ग ,वेंगुर्ले या तालुक्यातील 125 पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . पोलीस पाटील पदासाठी उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच विवाहित महिला असेल तर त्यांनी विवाह नोंदणी दाखला तसेच महसूल गावातील रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे. सावंतवाडी ,दोडामार्ग ,वेंगुर्ले या तीन तालुक्यात 125 महसूल गावामध्ये पोलीस पाटील भरती निवड प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजेपर्यंत तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकारणे व भरणे अशी प्रक्रिया होणार आहे. अर्जासाठी 25 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील 36, वेंगुर्ले ७२ दोडामार्ग 17 अशी पोलीस पाटील भरती निवड प्रक्रिया होणार आहे. तरी या कालावधीत जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# Police Patil recruitment# sawantwadi # vengurla # dodamarg#
Next Article