पोलीस अधिकाऱ्याकडे 200 कोटीची संपत्ती
हैदराबाद : तेलंगणात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) पोलीस उपअधीक्षक संकीरे•ाr भीम रे•ाr यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान 200 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या संपत्तीचा खुलासा झाला. छाप्यांदरम्यान तेलंगणा आणि कर्नाटकात फैलावलेल्या संपत्तींचे दस्तऐवज हाती लागले. यात पेंटहाउसयुक्त लक्झरी व्हिला, 4 आलिशान फ्लॅट्स, तीन भूखंड सामील आहेत. कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये हिस्सेदारी, 3000 चौरस फुटांची कमर्शियल स्पेस तसेच 50 एकरपेक्षा अधिक शेतजमिनीशी निगडित दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. एका मायनिंग कंपनीत 75 लाख रुपयांची गुंतवणूक अधिकाऱ्याने केल्याचेही समोर आले.
रोकड, सोनेचांदी, बँकांमध्ये ठेवी

एसीबीने पोलीस उपधीक्षकाच्या घरातून 3.6 लाख रुपये, एका कथित बेनामीदाराच्या घरातून 40 लाख रुपये, 2 किलो सोन्याचे दागिने, 20 किलो चदी आणि सुमारे 19.91 लाख रुपयांच्या बँकठेवींचा शोध लावला आहे. जप्त अचल संपत्तींचे बाजारमूल्य 200 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे एसीबीचे सांगणे आहे.