For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा जिल्ह्यात परप्रांतीय भंगारवाले पोलिसांच्या रडारवर! 'या' मोठ्या गुन्ह्यांमुळे आवळणार मुसक्या

04:56 PM Jun 17, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्ह्यात परप्रांतीय भंगारवाले पोलिसांच्या रडारवर   या  मोठ्या गुन्ह्यांमुळे आवळणार मुसक्या
Advertisement

Advertisement

गोडोली : सातारा जिल्हयातपरप्रांतीय भंगारवाल्यांच्या भंगाराचा पसारा वाढत चालला आहे. जवळपास सगळेच भंगारवाले भंगार घेताना आणि पुढे विक्री करताना जीएसटी शिवाय धंदा करत असल्याचे समोर आले आहे. तर विद्युत डीपी, विहिरींवरील मोटारी, दुचाकी चोरीतील आरोपी आणि हा चोरीचा माल खरेदी करणारे सुद्धा परप्रांतीय भंगारवाले असल्याने ते पोलीसांच्या रडारवर आले आहेत.

जीएसटी विभाग आणि पोलीसांकडून जिल्ह्यातील भंगारवाल्यांना टार्गेटजिल्ह्यात मजूरीसाठी आलेल्या अनेकांनी परप्रांतीय भंगारवाल्यांकडे कामाला सुरुवात केली. पुढे यातील अनेकजण स्वतःच हा व्यवसाय करूलागले. मात्र यातील अनेकांकडे जीएसटी नंबर काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याशिवाय ही मंडळी खरेदी आणि विक्री करतात. याबाबत तरुण भारतने सडेतोड वृत्त प्रसिद्ध

Advertisement

चोरीचा माल घेणारे संशयाच्या भोवऱ्यात
महावितरणच्या वायर, डीपी चोरी प्रकरणातील संशयीत आणि चोरीचा माल घेणारे वाढे फाटा येथील पाच परप्रांतीय भंगारवाले संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यातील काही चोरटे पोलीसांच्या चौकशीला सामोरे गेल्याचे समजते. आता जिल्ह्यातील सर्वच भंगारवाले जीएसटी चोरीसह चोरीचा माल घेण्यामुळे यापुढे रडारवर राहणार आहेत.
करुन कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केल्यावर जीएसटीसह चोरीचा माल खरेदी करणारे परप्रांतीय भंगारवाले रडारवर आले आहेत.यात कराड शहर आणि परिसर, सातारा शहर आणि परिसर, लिंब फाटा, मेढा, शिरवळ, लोणंद, पाचवड फाटा, कोरेगाव, मोळाचा ओढा, वाढे फाटा, औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय हे जीएसटी शिवाय भंगाराची खरेदी विक्री करण्याबरोबर चोरीचा माल घेत असल्यामुळे काहीजणांची चौकशी सुरु झाली आहे. यातील अनेक जण यापुर्वीच चोरी, बलात्कार, मारामारी, गोळीबार, गंभीर गुन्हातील आरोपी आहेत.

Advertisement
Tags :

.