For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandgad Murder Case लग्नात अडथळा ठरल्याने प्रेयसीला संपवले ;पण कायद्याचे हात अखेर लांब ठरलेच...तपास पथकाला ५० हजारांचे बक्षिस

03:33 PM Jun 12, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
chandgad murder case लग्नात अडथळा ठरल्याने प्रेयसीला संपवले  पण कायद्याचे हात अखेर लांब ठरलेच   तपास पथकाला ५० हजारांचे बक्षिस
Advertisement

चंदगड : तिलारी घाटातील जंगलात सापडलेल्या अनोळखी महिलेचा खून हा लग्नात अडथळा ठरत असल्याने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील वंतमोरी येथील गंगव्वा सत्याप्पा हंचीमणी (वय २५) हिचा खून तिच्या प्रियकराने आपले वडील व मामाच्या सहाय्याने करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तिलारी घाटातील जंगलात टाकल्याप्रकरणी कर्नाटकातून महिलेचा प्रियकर त्याचे वडील व मामाला गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतले आहे. यल्लाप्पा महिल्लाप्पा करणावर (वय ५७), बसवराज यल्लाप्पा करणावर (वय ३३) आणि लगमाप्पा अंकलगी (वय ३७) अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement

२९ मे रोजी आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात २९ मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आला होता. पोलिसात त्याची अकस्मात मृत्यूची नोंद होती. मात्र शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी डोक्यात गंभीर मारहाण झाल्याचे व हा नैसर्गिक मृत्यू नसून हा खून असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर अज्ञात आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे तपासात समोर आले होते.

Advertisement

त्यानुसार तपासाची चक्रे फिरवून व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपास पथकाची स्थापना केली. तपास करत असताना तिलारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून तिलारी घाटातून संशयास्पद व भरधाव जाणाऱ्या आणि काही मिनिटांत घाटातून वर आलेल्या एका चार चाकीचा व दुचाकीचा संशय आल्याने सखोल तपास केला असता सदरचा खून उघडकीस आला.

खुनातील मुख्य आरोपी

या खुनातील मुख्य आरोपी हा बसवराज यल्लाप्पा करणावर हा अविवाहित असून तो पेशाने शिक्षक आहे. त्याचे बेळगाव जिल्ह्यातील वंतमोरी येथील घटस्फोटीत गंगव्वा सत्याप्पा हंचीमणी हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. तिच्या घरी आई, बहीण व भाऊ असून ती घटस्फोटीत असल्याने त्यांच्यापासून ती वेगळी राहत होती.

ती कामानिमित्त बेळगाव, गोवा ठिकाणी वास्तव्यास असायची. दरम्यान तिचे बसवराजशी सूत जुळले व कालांतराने तिने बसवराजकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र तो तिला टाळून लग्न दुसरीकडे ठरवत होता. त्याचे लग्न ठरत आल्यानंतर गंगव्वा त्याचे लग्न मोडत होती म्हणून लग्नात अडथळा ठरणाऱ्या गंगव्वाचा बसवराजने काटा काढायचे ठरवून वडील व मामाच्या सहाय्याने तिला संपवले.

दुचाकीवरुन बेळगाव

यासाठी बसवराजने गंगवाला तिच्या गावातून बेळगावमध्ये दुचाकीवरून आणले व तिथून पुढे विशाळगडला जायचे आहे म्हणून चार चाकीतून तिलारी घाटात आणून डोक्यात प्रहार करून मारून टाकले. व मृतदेह जंगलात टाकून परत माघारी फिरले mmयासाठी त्याने वडील यल्लाप्पा करणावर व मामा लगमाप्पा अंकलगी यांची मदत घेतली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने प्रियकर बसवराज करणावर वडील यल्लाप्पा करणावर, दोघे (रा. राजकट्टी ता. हुक्केरी कर्नाटक) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (रा. कंचनठ्ठी ता. बेळगाव) या तिघांना ताब्यात खून प्रकरणी अटक केली. या खुनाची कबुली दिली असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. तर संशयितांना पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यातील आणखी एक संशयित कारचालक अपघातात जखमी झाल्याने ताब्यात घेता आलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, निंगाप्पा चौखंडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विजय कोळेकर, शेष मोरे, अतिश म्हेत्रे, प्रविण पाटील, दीपक घोरपडे, विजय इंगळे, समीर कांबळे, संजय कुंभार, तुकाराम राजगिरी, युवराज पाटील, अनिल जाधव, अरुण धनगर, सागर चौगले, आनंदा नाईक, राम पाटील, सुशिल पाटील यांनी केली.

परत येताना गाडीचा अपघात

गंगवाला मारल्यानंतर परत जाताना बसवराज हा आपले वडील व मामा यांना घेऊन दुचाकीवरून परत गेला. पण जी चार चाकी गाडी भाड्याने आणली होती, तो चालक भीतीने परत भरधाव वेगाने जाताना त्याच्या गाडीचा अपघात झाल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून पोलीस त्याचा शोध घेत असून या खुनात त्याला सह आरोपी करण्याची शक्यता आहे

११० किमी अंतर अन् १९१ बेपत्ता महिलांची पडताळणी

या खुनाचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक होता. तपास पथकाने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यातील तब्बल १९१ बेपत्ता महिलांच्या नोंदीची पडताळणी केली. याशिवाय बेळगाव ते हुबळी दरम्यान ११० किलोमीटर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

तपास पथकाला ५० हजारांचे पारितोषिक

सदरचा खून हा आरोपींनी कोणताही पुरावा मागे न ठेवता, परराज्यातून येऊन केला होता. त्यामुळे या खुनाचा तपास हा अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक होता. यासाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील दहा दिवस अहोरात्र प्रयत्न करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपास पथकाला ५० हजारांचे पारितोषिक जाहीर केल

Advertisement
Tags :

.