पेंडूर - सातवायंगणीतील जेष्ठांशी पोलिसांनी साधला संवाद
न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात तुळस बीट अंमलदार रंजिता चौहान व महिला अंमलदार रुपा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणुन घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बीट अंमलदार रंजिता चौहान व महिला अंमलदार रुपा पाटील यांच्या चांगल्या कामाप्रती पेंडूर सातवायंगणी नेवाळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या जाणुन घेऊन त्यांना मदत करुन त्याचे निरसन करण्याचे महत्वाचे काम सिंधुदुर्ग पोलीसांकडुन सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजातील अनुभवी व्यक्ती असुन त्यांचा मानसन्मान, आदर करणे आजच्या पिढीचे काम आहे.त्यातच ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा आणि त्यांचे आरोग्य, त्यांच्या समस्या या सर्व गोष्टींचा विचार करुन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करुन त्यांना दिलेला आधार मोलाचा ठरला आहे.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी गावातील, वाडीतील घरोघरी स्वत: आणि आपल्या अंमलदार यांना सांगुन ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचुन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणुन घेऊन त्याचे निरसन करण्याचे काम करत असताना दिसत आहेत. वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील तुळस बीट अंमलदार रंजिता चौहान व महीला अंमलदार रुपा पाटील यांनी तुळस होडावडा, मातोंड, पाल, पेंडुर या गावातील वाडीवाडीत जाऊन ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचुन त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्याचे निरसन करत आहेत. तसेच त्यांना एकत्र करुन मार्गदर्शन करुन त्यांच्याशी सुसंवाद साधुन आपुलकिचे नाते प्रस्थापित करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमधुन समाधान व्यक्त करण्यात आले. पेंडुर येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात बीट अंमलदार रंजिता चौहान व महीला अंमलदार रुपा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकाशी सुसंवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांप्रती त्यांची आपुलकी व आपलेपणा बघुन सर्वच जेष्ठ नागरिक भावूक झाले.यावेळी आयोजित कार्यक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.